Talathi Bharti Maharashtra 2023: नमस्कार मित्रांनो आपण बरेच दिवस झाल वाट पाहत होतो कि ते म्हणजे तलाठी भरती कधी होणार ? मात्र आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे तलाठी भरतीची जाहिरात ही आता प्रसिद्ध झालेली आहे, जिल्ह्यानुसार कोणत्या विभागात किती जागा आहेत या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत तर ही पोस्ट आवडली तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा.
आता प्रतिक्षा संपली आणि भरतीची तारीख आली आणि त्याचबरोबर लिंक देखील आली आहे आणि ती लिंक 26 तारखेला चालु होईल.
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
संपुर्ण जिल्ह्यांची माहीती घेउन फॉर्म Subh. फॉर्म भरताना घाई करु नका.
विषयांकित प्रकरणी राज्यातील तलाठी (गट-क) संवर्गाची रिक्त असलेली पदे 4644 पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने महसूली विभागनिहाय तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाचा पदांचा तपशील सोबत जोडलेल्या विवरणपत्र -अ मध्ये आहे. विवरणपत्र अ तक्त्यातील तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाच्या पदांवाचत मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणनिहाय तपशील (VACANCY MATRIX ) सोबत जोडलेल्या विवरणपत्र व प्रमाणे जिल्हानिहाय माहिती कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसात शासनास पाठविण्यात यावी. ( Talathi Bharti Maharashtra 2022-23 ) त्याकरीता तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने आपल्या विभागाच्या अधिनस्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात येणारी माहिती प्राप्त करुन ती शासनास सादर करण्याबाबत सर्व उपआयुक्त (महसूल) यांना “समन्वय अधिकारी” म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. तरी सदरची माहिती कोणत्याही परिस्थितीत विहीत कालावधीत तपासून खास दुताव्दारे शासनास पाठविण्याची दक्षता घ्यावी, ही विनंती Talathi Bharti Maharashtra 2022-23. जाहिरात PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

0 Comments
हि वेबसाइट शासकीय प्रकारची नसुन ही एक वैयक्तिक वेबसाइट आहे. त्यामुळे शासकीय योजना, जार व बातम्या तुम्ही एकदा खात्री करून घेतली. पाहिजे आणि मग पुढील नियोजन करणे आवश्यक आहे.